पंढरपूर : ( विशेष प्रतिनिधी ) - जिद्द बांधकाम कामगार संघटना,महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निवृत्ती सुतार व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती यांनी वेळोवेळी बांधकाम कामगारांना संघटनेच्या वतीने माहिती देऊन बांधकाम कामगारांना फॉर्म भरणे व शिष्यवृत्तीचे लाभ घेणे तसेच ग्रामसेवक यांच्या दाखल्यानेही नोंदणी होते याची माहिती दिली या माहिती आधारे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष मोनेश्वर आप्पासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वाखरीतील बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र कर्तव्यदक्ष ग्रामसेवक एस एस शिंदे यांनी देऊन सहकार्य केले.
15 ऑगस्ट 2025 रोजी 8:30 ध्वजावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बांधकाम कामगारांचा कार्यक्रम घेण्यात आला व बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणपत्र देऊन सहकार्य केल्याबद्दल कर्तव्यदक्ष ग्रामसेवक एस एस शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.त्यांनी केलेल्या सहकार्याने बांधकाम कामगारांना अनेक प्रकारचे आर्थिक लाभ बांधकाम कामगारांना मिळत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून नियमाचे पालन व स्थानिक चौकशी करून बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देऊन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळोवेळी बांधकाम कामगारांना सहकार्य केले.असे ग्रामसेवक व कर्मचारी प्रत्येक गावात असायला हवेत जेणेकरून बांधकाम कामगारांची उन्नती होईल.
सत्कार करताना अनेक मान्यवर उपस्थित होते, त्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा अध्यक्ष मोनेश्वर आप्पासाहेब सुतार,राहणार गोपाळपूर,तालुका पंढरपूर,जिल्हा सोलापूर; सरपंच धनश्री साळुंखे,माजी उपसरपंच विद्यमान सदस्य चंद्रकांत चव्हाण,संग्राम गायकवाड,माजी सरपंच विद्यमान सदस्या कविता पोरे,सदस्या दिपाली पिसे, छायादेवी लोखंडे,वैशाली पांढरे,माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश गायकवाड सर,ग्रामपंचायत कर्मचारी नाना पोरे,लक्ष्मण वाघमोडे,दाजी शिंदे,करण कांबळे, रोहित गायकवाड,अंबादास लोखंडे,विठ्ठल लोखंडे, समाधान महारनवर,अनिल महारनवर,समाधान महारनवर,सुनील महारनवर,बबलू पोरे,समाधान पोरे,काशिलिंग सलगर,आमजाम मुजावर,लक्ष्मण शेंडगे,भारत शेंडगे,ज्ञानेश्वर शेळके,अमोल पोरे, तोशिब मुजावर,सतीश शिंदे,मनोज मांगाडे उमेश मांगडे बांधकाम कामगार व वाखरी ग्रामस्थ उपस्थित होते.