ठाणे,दि.21 :- वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि.22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, तलाव पाळीजवळ, डॉ.मूस मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे “जनता दरबार” आयोजित करण्यात आला आहे.
दि.22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्या समस्यांचा निपटारा करून घ्यावा, असे मंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.