डोंबिवली ( शंकर जाधव ) : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पटनाईक यांना पुणे येथे "सह्याद्रीरत्न पुरस्कार" देवून विशेष सन्मानित करण्यात आले.पुणे येथील, पुणे पत्रकार भवन सभागृहात रविवार १० ऑगस्ट रोजी टॅलेंट कट्टा आयोजित राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार आणि डॉक्टरेट पुरस्काराचे विशेष आयोजन टॅलेंट कट्टाचे संस्थापक/अध्यक्ष-दीपक जाधव व त्यांच्या टीम ने केले होते.या विशेष पुरस्कार सोहळ्यात मराठी शॉर्ट फिल्म निर्माते नितीन धवणे-पाटील,प्रसिद्ध सिने अभिनेत्री आर्या घारे,विशेष अतिथी अनिल आयसे,समाज सेविका डॉ.कल्पना दिलीप कपोते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांना "सह्याद्रीरत्न पुरस्कार" दिग्गज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.दरम्यान सिने अभिनेत्री करुणा कातखडे यांचा ही सिने अभिनेत्री आर्या घारे व निर्माता नितीन धावणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुरस्कार विजेते ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार व मराठी शॉर्ट फिल्म निर्माता,दिग्दर्शक,कवी,गीतकार,गायक सुभाष पटनाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सह्याद्रीरत्न पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला.सुभाष पटनाईक यांना मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक तसेच दिल्ली येथे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ज्येष्ठ पत्रकार सुभाष पटनाईक यांचे नातेवाईक,मित्र-मंडळी यांनी कौतुक केले.