डोंबिवली ( शंकर जाधव ) : डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व आदरणीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्याचे संकलन आणि त्यातून खतनिर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य गौरी गणपती विसर्जन स्थळांवर जसे डोंबिवली पूर्व, पश्चिम, ठाकुर्ली तसेच ग्रामीण विभाग जसे की खोणि, वाकळण, डायघर, खिडकाळी, दहीसर या भागात एकूण २३ हुन आधीक गणेश विसर्जन स्थळांवर हे कार्य करण्यात आले तसेच प्रतिष्ठान च्या सदस्यl मार्रफ़त पोलीस मित्र म्हणूनही कार्य करण्यात आले.
या कार्यामध्ये १,००० हून अधिक श्री सदस्य सक्रियपणे सहभागी झाले. विसर्जनासाठी आणलेल्या गणेश मूर्तींसोबत असलेल्या निर्माल्याचे या ठिकाणी संकलन केले गेले. प्रतिष्ठानच्या श्री सदस्यlनी हे संकलित केलेल्या निर्माल्या मधील दोरा, प्लास्टिक, कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या आणि फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या. येकुण १ टन हुन अधीक पाकळ्यांच संखलन करण्यात आले. जमा केलेल्या पाकळ्या उंबार्ली येथे नेऊन त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. हे खत उंबारली व इतर ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या वृक्षांना पुरवले जाते. आजपर्यंत, डोंबिवली आणि ठाकुर्ली भागात प्रतिष्ठानने ६,५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केलेली आहे आणि ५ टनपेक्षा अधिक गांडूळ खत तयार केले आहे.
हे प्रतिष्ठान डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी कार्य करत आहे. बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, बालसंस्कार मार्गदर्शन, वृक्ष लागवढ व संवर्धन, जल पुनर्भरण, स्वच्छता अभियान, विहिरी व तलावांची स्वच्छता, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, व्यव्यसाय मार्गदर्शन केले जाते.तसेच या प्रतिष्ठानचे कार्य फक्त भारतातच नाही, तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, नॉर्वे, दुबई आणि कतारसारख्या अनेक देशांमध्येही सुरू आहे. अजपर्यत या प्रतिष्ठानतर्फे अमेरिका आणि इतर देशा मधे ही स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, ब्लड आणि प्लाज़मा डोनेशन, क्यान्सर अवेरनेस इत्यदी उपक्रम राबवले आहेत.
