Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे आयोजित “अभियंता दिन” व “आदर्श अभियंता पुरस्कार वितरण समारंभ” उत्साहात संपन्न

ठाणे दि. १५ :- भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त “अभियंता दिन” व “आदर्श अभियंता पुरस्कार वितरण समारंभ” जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. १५ सप्टेंबर, २०२५ रोजी समिती सभागृह, बी. जे. हायस्कुल, टेंभी नाका, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात “अभियंत्यांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. अभ्यासपूर्वक व तांत्रिक कौशल्य आत्मसात करून कामकाज करणे हीच खरी प्रगती आहे. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारल्यास ग्रामविकास आणि लोककल्याणाचे उद्दिष्ट साध्य होईल. जिल्हा परिषदेतील अभियंते ही विकासयात्रेतील प्रमुख ताकद असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे.” असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “जिल्हा परिषदेतील अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. कामकाज अधिक सुलभ व परिणामकारक होण्यासाठी समन्वय, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरतो. या माध्यमातून समाजहिताचे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवता येतील.”

कार्यकारी अभियंता, बांधकाम इंजि. पद्माकर लहाने यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांना विकास कामे तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण करण्यात अग्रेसर रहावे याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र (राज्यस्तर)शाखा ठाणेचे सचिव इंजि.मंगेश मसुरकर यांनी जिल्हा परिषद अभियंत्याच्या वतीने अभियंता दिनाच्या निमित्ताने नागरिकांना दर्जेदार व टिकाऊ कामे करून अभियंत्याच्या प्रती विश्वास निर्माण करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे आगमन, दीपप्रज्वलन व भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेचे पूजन याने झाली.

आदर्श अभियंता पुरस्कार प्राप्त अभियंते

1. इं. अनिल जिवनराव दिवाण, शाखा अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग, शहापूर – आदिवासी भागात उल्लेखनीय सेवा.

2. इं. मनिषकुमार बागलराव हेर्लेकर, कनिष्ठ अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग, कल्याण – प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागात विशेष कार्य.

3. इं. कैलास पंडितराव खलाणे, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ठाणे – पाणीटंचाई निवारण कामात कौशल्यपूर्ण योगदान.

4. इं. विजय भिमराव सुलताने, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जि.प. बांधकाम उपविभाग, भिवंडी – अभियंता तसेच रंगभूमीवरील कलावंत म्हणून उल्लेखनीय कार्य.

सेवानिवृत्त अभियंते यांचा देखील या समारंभात सत्कार करण्यात आला. यात इं. विलास चौधरी, इं. संतोष विशे, काशिनाथ भोईर, अनिल वाणी, विजय खानविलकर, प्रकाश सांबरे, तुकाराम जंगम, किशोर कुंभारे, युवराज निपुर्ते व शेख मोहम्मद शरिफ यांचा समावेश होता.

तसेच पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

• उप अभियंता पदावर पदोन्नती : इं. राजेंद्र नाळे, इं. विजय विसावले, इं. श्रीम. विजया पांढरे, इं. मनोज क्षिरसागर, इं. केतन चौधरी.

• कनिष्ठ अभियंता (बांधकाम) पदावर पदोन्नती : इं. वसंत मोरे, इं. श्रीम. भावना बेलदार, इं. किरण गोतारणे, इं. श्रीम. माधुरी दांडकर, इं. गौरव शिंदे, इं. अमेय पाटील, इं. विजय सुलताने, इं. वसंतकुमार निरगुडे, इं. प्रशांत पवार.
या प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रकाश सासे, कार्यकारी अभियंता सर्व शिक्षा अभियान युवराज कदम यांसह जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |