डोंबिवली : विष्णूनगर डोंबिवली पश्चिम येथे राहणारे शांत, सरळ व्यक्तिमत्व असणारे मनोज (बाबू ) विष्णू जाधव यांचे शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली मनोज जाधव, मुलगा कु. यश मनोज जाधव मुलगी कु. मीनल मनोज जाधव, बहीण, भाऊ, काका, पुतणे असा मोठा परिवार आहे. नेहमीच शांत स्वभाव असणारे, तसेच सर्वांशी आपुलकीने वागणारे असे मनोज यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने जाधव परिवार व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डोंबिवली येथील समश्यानभूमीत शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात कुटुंबीय, व नातेवाईक उपस्थित होते.
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता रेतीबंदर मोठागाव डोंबिवली (पश्चिम) येथील गणेश घाट येथे होणार असून उत्तरकार्य ( तेरावा विधी ) गुरुवार १८ सप्टेंबर २०२५ रोजी भागीरथी अपार्टमेंट नं.२ गुप्ते रोड, विष्णूनगर डोंबिवली पश्चिम येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
