उरण दि २० ( विठ्ठल ममताबादे ) : प्रत्येकाच्या जीवनात आनंद देणारा आनंदोत्सव म्हणजेच प्रकाशोत्सव अर्थातच दिवाळी.हा उत्सव आदिवासी बांधवांना आनंदात साजरी करता यावी यासाठी राजू मुंबईकर यांनी पनवेल येथील तारा ग्रामपंचायत हद्दीतील कर्नाळा किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कोरळवाडी आणि उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासीवाडी या आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना रवा,मैदा,साखर,गोडेतेल,बेसन,खोबरेलतेल अश्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू प्रेमाची भेट म्हणून देऊन त्यांना आपुलकी भरल्या मनाने दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
या क्षणी समाजसेवक राजू मुंबईकर,समाज सेवक अविनाश सिंग आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष,प्राध्यापक स्नेहल पालकर,विलासभाऊ ठाकूर ( काॅन सल्लागार) सुरेंद्रजी पाटील( काॅन वेश्वीशाखा उपाध्यक्ष), देवनदादा ठाकूर ( काॅन पदाधिकारी ),नितेश मुंबईकर,अनिल घरत( लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सोशल मि.रायगड जिल्हा अध्यक्ष ), पिरकोन गावचे सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील, सारडे गावचे सामाजिक कार्यकर्ते नवनीत पाटील,मित्र परिवाराचे पदाधिकारी संपेश पाटील, रोशन,पाटील,क्रांती म्हात्रे, कु.मयंक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व मंडळींच्या उपस्थितीत दिवाळी सणाच्या निमित्ताने राजू मुंबईकर यांनी या आदिवासीं बांधवां करिता दिलेली ही प्रेमाची आणि आपुलकीची भेंट मिळाल्यावर कोरळवाडी व पुनाडे आदिवासी वाडीवरील त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील ते आपुलकीचे निरागस आनंदी भाव पाहून खरचं दिवाळी सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आणि दिवाळीच्या प्रकाशमय भावनिक रंगात न्हाऊन गेला.