Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिवा येथे हृदयद्रावक घटना : कर्तव्य बजावताना अग्निशमन जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दिवा:- दिवा परिसरातील खर्डीगाव येथे रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत अग्निशमन दलातील जवानाचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मृत जवानाचे नाव उत्सव अशोक पाटील (वय २८, रा. दातीवली गाव, दिवा) असे असून, ते अत्यंत तत्पर आणि जबाबदार जवान म्हणून ओळखले जात होते.

खर्डीगाव येथील ओव्हरहेड वायर्सवर एक कबूतर अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले होते. यावेळी बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या उत्सव पाटील यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.

या घटनेत त्यांचे सहकारी जवान आझाद पाटील (वय २९, रा. वाडा, पालघर) हे देखील जखमी झाले असून त्यांच्या हाताला व छातीला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त श्री. दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.

अग्निशमन दलाच्या एका शूर जवानाच्या निधनाने संपूर्ण दिवा विभागात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनामुळे सहकाऱ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |