दिवा : दिवा शहरातील रस्ते हे फेरीवाल्यांनी व्यापलेले असताना महानगर पालिका मात्र सुस्त पडलेली दिसून येते. दिवा प्रभाग समिती कडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मन्युष्यबळच उपलब्ध नसल्याची अजब माहिती पुढे आली आहे.
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक सायंकाळी ६ पासून रात्री ९.३० पर्यंत सुरू करण्यात आले होते. पण आता मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सायंकाळी ६ नंतर कोणतेही कर्मचारी उपलब्ध नसतात. तसेच या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी वाहने आणि तत्सम गोष्टी देखील महापालिकेकडून उपलब्ध होत नाहीत अशी माहिती पालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून समजल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी केला आहे.
जर अशा मूलभूत प्रशासकीय गोष्टींसाठी देखील जर महापालिकेकडे मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर दिवा प्रभाग समिती खाजगी कंपनीकडे चालवण्यासाठी देण्याचा उपरोधिक सल्ला प्रशांत गावडे यांनी दिला आहे.
