Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दसरा मेळाव्याच्या औचित्याने दिवा रेल्वे स्टेशनवर अपंगांना आधार — व्हीलचेअर वाटप कार्यक्रम संपन्न

दिवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांच्या पुढाकाराने, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, आज दसरा मेळाव्याच्या औचित्याने दिवा रेल्वे स्टेशन परिसरात सामाजिक बांधिलकी जपत व्हीलचेअर वाटप करण्यात आले.

शिवसेना पक्षाचे अधिष्ठान असलेले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या तत्त्वावर भर दिला. हाच वारसा आणि शिकवण पुढे नेत अॅड. रोहिदास मुंडे यांनी दिव्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेऊन दिव्यातील गरजू आणि अपंग नागरिकांना मदतीचा हात दिला.

यापूर्वीच दिवा रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर मनोज कुमार गुप्ता यांनी अपंग प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अडचणींची माहिती देत, त्यांना तातडीने व्हीलचेअरची गरज असल्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अॅड. रोहिदास मुंडे यांनी तत्काळ पुढाकार घेऊन आज दिवा स्टेशनवर व्हीलचेअर वाटप केले.

व्हीलचेअर मिळाल्यानंतर स्टेशन मास्टर मनोज कुमार गुप्ता यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते. हा उपक्रम शिवसेनेच्या सेवाभावाचे आणि समाजाशी असलेल्या नात्याचे प्रतीक ठरला. अशा लहानशा उपक्रमातूनही सामान्य माणसाच्या जीवनात मोठा बदल घडवता येतो, यावर या उपक्रमाने शिक्कामोर्तब केले.

या प्रसंगी अॅड. रोहिदास मुंडे म्हणाले , "शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नाही तर लोकांच्या सुख-दु:खात सदैव सोबत उभी राहणारी कुटुंबवत्सल ताकद आहे. आमचे मार्गदर्शक उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांतूनच आम्ही सतत कार्य करतो. दिव्यातील सर्व नागरिकांना सुखसोयी, आधार आणि मदत मिळावी हा माझा ध्यास आहे. हे कार्य आज व्हीलचेअर वाटपापर्यंत मर्यादित न राहता भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात विविध सेवा उपक्रमांद्वारे सुरू राहील."

यावेळी शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे,
 योगिता नाईक (विधानसभा संघटिका),सचिन पाटिल (शहर प्रमुख),अभिषेक ठाकूर (युवा सेना शहर अध्यक्ष), प्रियांका सावंत (शहर समन्वयक), हेमंत नाईक (विभाग प्रमुख), संजय जाधव (विभाग प्रमुख), नितीन सावंत (उप विभाग प्रमुख), अजित माने (उप विभाग प्रमुख), संजय निकम (उप विभाग प्रमुख), अशोक अमोंडकर (उप विभाग प्रमुख), अमोल म्हात्रे (उप विभाग प्रमुख), संदिप राऊत (उप विभाग प्रमुख), कृष्णा जाधव (शाखाप्रमुख), दत्ता भोसले (शाखाप्रमुख), विलास उत्तेकर (शाखाप्रमुख), श्रावणी कदम (शाखाप्रमुख), शशिकांत कदम (शाखाप्रमुख), शशिकांत कुंभारगण (उप शाखाप्रमुख), महेश मुळम (उप शाखाप्रमुख), धनाजी पोवार (उप शाखाप्रमुख), सचिन चव्हाण (उप शाखाप्रमुख), राजेश गोफणे (युवा उप शाखाप्रमुख), राजेंद्र आगटे (गट प्रमुख), संदिप जाधव (गट प्रमुख), संमीर घाणेकर (गट प्रमुख),भारती कांबळे (शिवसैनिक),आकाश विचारे (शिवसैनिक), सखाराम मोरे यांच्यासह दिवा स्टेशन मास्टर मनोज कुमार गुप्ता व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजकारणाच्या या वाटचालीत प्रत्येक शिवसैनिकाने सहभाग घेतल्याने दिव्यातील शिवसेनेची एकजूट व बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |