दिवा / ठाणे : दिवा विभागातील परिचारिका (प्रसूती सेविका) उमिता बांते यांनी नाव नोंदणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेशी अमानवी व शिवराळ भाषेत बोलणे तसेच दमदाटी केल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून या गैरप्रकाराविरोधात ठाम भूमिका घेत आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने तात्काळ चौकशी करत संबंधित परिचारिकेची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यातील जनतेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
निवेदन देताना शिवसेना ठाणे शहर प्रमुख अनिश गाढवे, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे, कलवा–मुंब्रा विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते, विभाग प्रमुख नागेश पवार उपस्थित होते.
या प्रकरणात शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली, असे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद पाटील व उपायुक्त (आरोग्य) गोदापुरे साहेब यांनी नागरिकांच्या तक्रारीला गांभीर्याने घेऊन केलेल्या तातडीच्या कारवाईबद्दल शिवसेनेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
