पाणी प्रश्न सोडविला नाही तर पालिका कार्यालयाट ठिय्या आंदोलनाचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिमेकडील कैलासनगर व शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष डॉ. सर्वेश सावंत यांची भेट घेऊन पाणी समस्येबाबत सांगितले. शुक्रवार 10 तारखेला डॉ.सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डोंबिवलीतील पालिकेच्या 'ह'प्रभाग क्षेत्र कार्यालयात धडक मोर्चा काढला. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांची मोर्चेकऱ्यांनी भेट घेतली.
दिवाळी सण जवळ आला तरी पुरेसे पाणी का मिळत नाही याचा जाब भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष डॉ. सावंत यांनी यावेळी विचारला. पाण्याच्या समस्या लवकरात लवकर सुटेल असे आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.याबाबत डॉ. सावंत म्हणाले, पालिका प्रशासनाने दिवाळी सणाआधी कैलासनगर व शास्त्रीनगर परिसरातील पाणी समस्या सुटली नाही तर नागरिकांसह 'ह'प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटण्याकरता पालिका प्रशासनाने नवीन प्रोजेकट बाबतभाजपा प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले आहे.डोंबिवली पश्चिमेकडील पाणी समस्याबाबत लक्ष देऊन जोवर नागरिककांना योग्य पाणी पुरवठा होत नाही तोवर आम्ही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करू.- डॉ.सर्वेश सावंत, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष
