डोंबिवली : डोंबिवली नजीक असणाऱ्या मोठा गाव ठाकुर्ली येथील नारायण काशिनाथ भोईर यांचे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ७० वर्षे होते. मोठागाव ठाकुर्ली येथील समशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा प्रमाणात ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
भोईर यांच्या पश्चात दोन मुले श्रीधर व उमेश, दोन मुली सुलोचना व गीता तसेच सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांचा निधनाने भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा दशक्रिया (दहावा ) दिनांक ५ डिसेंबर रोजी मोठागाव गणेश घाट रेतीबंदर रोड डोंबिवली तर तेरावा विधी (उत्तरकार्य ) दिनांक ८ डिसेंबर मोठागाव ठाकुर्ली येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
