ठाणे ता २३ नोव्हें : ठाण्यात रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापनदिन अनेक मान्यवरांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका येथे पार पडला.
सदर वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला रिपब्लिकन सैन्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामभाऊ तायडे (महाराष्ट्र राज्य नेते) यांनी कार्यक्रमाची पूर्ण आखणी केली होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रसंगी रिपब्लिकन सैन्याने येणाऱ्या आगामी निवडणुकीत मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्रित निवडणुकीला समोर जाण्याचे ठरवले असून प्रसंगी अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका येथे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला,
