Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

बनावट वेबसाइट्स,अॅप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा - परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबई - राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

परिवहन विभागाने सांगितले आहे की, फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे “चलन बाकी आहे”, “परवाना सस्पेंड होणार आहे” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही.

तसेच “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan Pay.apk” अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी VAHAN – (वाहन नोंदणी) https://vahan.parivahan.gov.in, SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा पोर्टल

https://www.parivahan.gov.in तसेच ई-चालान पोर्टल

https://echallan.parivahan.gov.in या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये.

कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टल चे https://www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |