पालिकेच्या रुग्णालयात आयसीयुचा वापर नाही
मनसेचे ऑक्सिजन मास्क अनोखे आंदोलन
कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील वा कल्याण मधील रुग्णालयात आरोग्य सेवा कमी पडत आहे अशो ओरड सुरु आहे. दोन महिन्यापूर्वी सर्पदंशाने दोन मुलींचा जीव गेला. त्यांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचाराकरता आणले असता वेळेवर उपचार झाले नाही असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार) वा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रुग्णालयांच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. मंगळवार २ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण येथील पालिकेच्या रुग्णलयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन मास्क अनोखे आंदोलन केले केले. पालिकेच्या आवारात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
मनसेचे पदाधिकारी कपिल पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी हे गेड्याच्या कातडीचे आहेत. या अधिकाऱ्यांना कितीही निवेदन द्या, त्यावर समाधानकारक काहीही हालचाली होत नाहीत. डोंबिवली सर्पदंशाने एक तरुण मुलगी आणि लहान मुलगी यांचा जीव गेला. पालिकेच्या रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तर कल्याण मधील रुग्णालयात एका वृद्ध महिलेवर उपचाराकरता अतिदक्षता विभाग कमी पडले आणि मुंबईत जाण्याचा सल्ला देण्यात आले. याचा अर्थ असा होतो की करदात्या नागरिकांच्या पैसातून अतिदक्षता विभागावर केलेला खर्च वाया गेला.याचा निषेध करत आम्ही असे आंदोलन केले.
