Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कोकणचे सुपुत्र रुपेश कोलते"कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर) : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल शेजारी मूर (कोलतेवाडी) येथील नवतरुण युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता,सध्या मुंबई -डोंबिवली (पूर्व) येथे वास्तव्यास असलेले रुपेश कोलते यांचा नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघ येथे स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. संजय कोकरे आणि संपूर्ण टीमच्या शुभ हस्ते "कोकण रत्न मानद पदवी -२०२५ ने गौरव करण्यात आला.

रुपेश कोलते हे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून,व्यवसायाच्या माध्यमातून मुंबई, कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने सामाजिक कार्य करत आहे.या कार्याची दखल घेऊन कोकणातील सर्वात मोठा “कोकण रत्न मानद पदवी पुरस्कार” देण्यात आला.त्यांना हा पुरस्कार स्वतंत्र कोकण राज्य अभियान यांच्या वतीने संस्थापक व अध्यक्ष मा. श्री.संजय कोकरे साहेब यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या व कोकणातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व संपादक मा.श्री. सचिन कळझूनकर,मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे आणि सल्लागार श्री दिलीप लाड आदी मान्यवर उपस्थित होते.हा सन्मान सोहळा समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, महिला व संस्थांना पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.या कार्यक्रमात व्यवसाय, सामाजिक कार्य, शिक्षण, साहित्य, कला, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन व जनकल्याण

या विविध क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांना “कोकण रत्न” पदवीने गौरव करण्यात आला.

गेल्या सहा महिन्यांत रुपेश कोलते यांना अनेक व्यवसायिक व सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले,

परंतु कोकणातील सर्वात मोठा “कोकण रत्न मानद पदवी पुरस्कार”हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि आयुष्यातील मोठा टप्पा आहे.हा सन्मान माझ्या सर्व कोकणवासीय जनतेला, कोकणातील माझ्या सर्व ग्राहकवर्गाला,

आणि मला सातत्याने साथ, सहकार्य व आशीर्वाद देणाऱ्या संपूर्ण सपोर्ट सिस्टीमला मी समर्पित करतो.

असे मत मराठी युवा उद्योजक,श्री.स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर श्री.रुपेश चंद्रकांत कोलते

डोंबिवली (पूर्व)(मो. 8928225996) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोकणचे सुपुत्र रुपेश कोलते"कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचे पत्रकार मित्र, विविध पत्रकार संघ, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, राजकीय पक्ष नेते, असंख्य वाचक, चाहते, हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |