डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
हा जाहीर प्रवेश आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यामध्ये शर्मिला अजय म्हात्रे (शाखा संघटिका), मनाली मंगेश उगवे, वनिता देवकर, नंदा चव्हाण, भारती फडणीस, भाग्यश्री येवले, वृषाली जगताप, सपना पवार, गीता डोके, कुंदा डिके व ज्योती दलवी या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
महिलांचा सन्मान करणारा, निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणारा आणि खऱ्या अर्थाने महिलांना बळ देणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रवेशावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर, धनंजय बोराडे, जिल्हा संघटक अभिजीत सावंत, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे, शहरप्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
