ठाणे :- जनगणना 2027 Houselisting Block Formation (घर यादी तयार करणे) बाबत महत्वाचे प्रशिक्षण आज दि.19 जानेवारी रोजी समिती सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जनगणना संचालनालयाचे अधिकारी श्री. प्रवीण भगत, सहाय्यक निर्देशक व सांख्यिकी अन्वेशक श्री. अरुण साळगांवकर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व चार्ज अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त जनगणना विषयक कामकाज हाताळणारे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना Houselisting Block Formation (घर यादी तयार करणे) बाबत प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी स्वतः जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, तहसिलदार (सर्वसाधारण) श्री.सचिन चौधर, भिवंडी तहसिलदार श्री.अभिजित खोले, मुरबाड तहसिलदार श्री.अभिजित देशमुख, शहापूर तहसिलदार श्री.परमेश्वर कासुळे, अंबरनाथ तहसिलदार श्री.अमित पुरी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
