Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे महानगरपालिकेच्या वाहनचालकाचे मद्यप्राशन प्रकरणी तात्काळ निलंबन

ठाणे, (16) : ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष बळीराम तेटवार याला कर्तव्यावर असताना मद्य प्राशन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे

आज ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष बळीराम टेटवार तसेच खाजगी वाहनचालक विपुल भरत बनकर हे वाहन क्रमांक MH 04 KU 2323 मध्ये कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करत असल्याचे निदर्शनास आले.

प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधित दोन्ही वाहनचालकांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

सदर प्रकार अत्यंत गंभीर मानून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अन्वये सतीष बळीराम टेटवार या वाहनचालकाला आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या प्रभावाने तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर विपुल भरत बनकर हा खाजगी वाहनचालक असल्याने त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास कळविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |