Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कोपरखैरणे मध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; विजेत्या संघाला मिळणार बोकड ( बकरा ) बक्षीस

नवी मुंबई:- कोपरखैरणे गावांमध्ये या वर्षी सहयोग मित्र मंडळ आयोजित कै.महेंद्र वेटा ( कपुर दा ) यांच्या स्मरणार्थ प्रयुक्ता मित्र मंडळ ( आयोजक) श्री.जय बाळाराम म्हात्रे आणि रेडमुन एजेन्सी ( आयोजक) श्री.राजेश लालचंद्र वेटा यांच्या सहकार्याने श्री कुलदैवत कुटुंबीय क्रिकेट स्पर्धा होळी चषक २०२६ स्पर्धेचे प्रवेश विनामूल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत कोपरखैरणे गावातील सर्व कुलदैवत कुटुंबीयातील खेळाडू खेळणार आहेत.प्रत्येक कुटुंबीय क्रिकेट संघातील ११ खेळाडू मध्ये ५०+२ खेळाडू खेळणार आहेत.या स्पर्धेचे पारितोषिक खास करून विजेत्या कुलदैवत कुटुंबीयांना मोठा बोकड (बकरा ) व आकर्षक चषक आणि उपविजेत्या कुलदैवत कुटुंबीयांना छोटा बोकड ( बकरा ) तसेच तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुलदैवत कुटुंबीयांना ६ कोंबड्या ही कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

अश्या प्रकारे ही स्पर्धा कोपरखैरणे येथील सेक्टर -२३ येथील भुमि पुत्र मैदान येथे येत्या ०२ मार्च रोजी सोमवारी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.या स्पर्धेचे प्रयुक्ता मित्र मंडळ आणि रेडमुन एजेन्सी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.या स्पर्धेत टोटल १२ संघ खेळवले जाणार आहेत.प्रत्येक सामना ३ षटकांचा राहील या स्पर्धेमध्ये १४४ खेळाडू आपले नशीब अजमवनार आहेत.

ही स्पर्धा व्यवस्थित पार पडावी म्हणून चंद्रकांत पाटील ( आयोजक ),विनय वेटा, मनोज वेटा, रूपेश पाटील, दिलीप पाटील , योगेश म्हात्रे, राकेश वेटा, श्रीनिवास पाटील,संदीप पाटील (लालु ),शिवाजी जाधव, संजय पाटील,रवि वेटा, विराज वेटा,सुधिर पाटील, राकेश म्हात्रे, सचिन म्हात्रे (विठ्ठल ), ज्ञानेश्वर पाटील (ज्ञानबा )आणि राजु म्हात्रे आदी ग्रामस्थ खेळाडू मेहनत घेत आहेत.असे कोपरखैरणे गावातील क्रिकेट प्रेमी अविनाश भरत पाटील यांनी अशी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |