डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनुसार, कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारांने, कल्याण ग्रामीण विधानासभा मतदार आमदार राजेश मोरे तसेच माजी नगरसेवक नितिन पाटील व ६५ इमारतीचे शिष्टमंडळ यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मंगळवार २४ तारखेला रोजी नगर विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या मंत्रालयातील दालनात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल यांच्या सोबत सकारात्मक आणि 65 इमारती मधील नागरिकांना दिलासा दायक अशी व्हिडीओ कॉन्फरेन्स संपन्न झाली.
सदर सभेत अन्यायग्रस्त 65 इमारती चे एक संघटन स्थापन करणे व त्यास अधिकृत मान्यता यावी यासाठी त्याची नोंदणी करणे रजिस्ट्रार यांना त्याबाबत निर्देश देण्यात आले.चूक नागरिकांची नसल्याने अन्यायग्रस्त नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे सहकार्य केले जाईल.विद्यमान कायद्यातील तरतुदीत नाममात्र फेरबद्दल करून 65 पैकी अधिकाश इमारती या नियमित होऊ शकणार आहेत.त्यामुळे त्या दृष्टीने पाऊले उचलली जातील याबाबत सर्वच विभागानी सहमती दर्शविली. इमारतीना जागेचा मालकी हक्क मिळवून दिला जाईल त्यासाठी आवश्यक कागदपत्रे संचिका महापालिका कार्यालयात सादर करणे. एक इमारत फाईल तयार आहे त्याबाबत देखील माहिती देण्यात आली. 31 मार्च पूर्वी न्यायालय यांना देखील सर्व माहिती देऊन इमारत निष्कासित करण्याऐवजी त्या नियमित होऊ शकतात याबाबत माहिती देण्याचे पालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात आले. कॉन्व्हेयन्स करणे तसेच 7/12 नोंदी अद्ययावत करणे बाबत जिल्हाधिकारी यांना देखील सहकार्य करणे बाबत निर्देश देण्यात आले.
65 अन्यायकारक इमारती मधील नागरिकांना दिलासादायक आणि सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारी आजची सभा ठरली.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे निश्चितच आम्हा सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होतील याबाबत शंका नाही असे 65 इमारती शिष्ट मंडळाने मनोगत व्यक्त केले.
