ठाणे : शुक्रवारी पार पडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या २०२६-२०२७ या अर्थसंकल्पीय महासभेत प्रभाग क्रमांक 28 मधील नगरसेवक दीपक नामदेव जाधव यांनी आपल्या प्रभागातील (विशेषतः दिवा, आगासन , दातिवली, म्हातार्डी, बेतवडे परिसर) प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आणि खालील प्रमुख मागण्या केल्या:
👉ठाणे महापालिका शाळा क्र. 88 चे नूतनीकरण करावे.
👉शाळा इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत (CBSE पॅटर्न) सुरू करावी.
👉महापालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत.
👉आगासन, म्हातारडी व बेतवडे येथील स्मशानभूमींचे नूतनीकरण करावे.
👉आगासन व दातिवली येथील रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन्ही फाटक बंद करून त्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल (ROB) बांधावा.
👉आगासन व देसाई गावांदरम्यान खाडीवरील पुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण करावे.
👉 दिवा शहर प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याबाबत आनंद व्यक्त करत, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिवा शहरात उभारण्यात यावा.
👉आगासन गावातील दोन्ही गणपती घाटांचे नूतनीकरण करावे.
👉 दिवा शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
👉भटक्या जखमी व आजारी कुत्र्यांवर उपचार करून त्यांचे निर्बीजीकरण करावे.
👉तरुणांसाठी नवीन व्यायामशाळा उभारून आवश्यक व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे.
👉 प्रभाग क्रमांक 28 मध्ये नवीन आरोग्य केंद्र उभारावे.
👉दिवा शहरात पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
👉प्रभाग स्वच्छ, सुंदर व सुरक्षित राहण्यासाठी नियमित साफसफाई व आवश्यक उपाययोजना कराव्यात.
👉पावसाळ्यापूर्वी गटारे व नाल्यांची साफसफाई करून पाणी साचणे, पूर व रोगराई टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
