Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आगरी- कोळी समाजातील कणखर धवलारीन नानूबाई म्हात्रे

नवी मुंबई : आगरी कोळी समाजातील लग्न समारंभात पारंपरिक " धवलारीन " गीत गायली जातात.या गीतांमधून आगरी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा अभिमानाने जपला आहे. धवलागीत म्हणणाऱ्या महिलांना 'धवलारिन' असे म्हटले जाते.प्रामुख्याने ६० ते ८० या वयोगटातील जेष्ठ महिला हे गीत सादर करण्यात अग्रेसर आहेत.या महिलांची संख्या सुद्धा बोटावर मोजण्या इतकी झाली आहे.त्यामुळेच आजच्या माॅडर्न युगातही आगरी कोळी समाजातील गीतांची संस्कृती जपण्यासाठी कोपरखैरणे च्या नानूबाई म्हात्रे ने कंबर कसली आहे.

आगरी कोळी समाजातील लग्न समारंभात ' धवलारिनी' ला विशेष महत्त्व असल्याचे दिसून येत आहे.यातच हा सन्मान आपल्या कलेतून नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील जेष्ठ महिला नानूबाई दत्तु म्हात्रे यांनी मिळवला आहे. धवलारिन नानूबाई म्हात्रे यांनी त्यांच्या आई कैलासवासी तुलशीबाई गणपत पाटील यांच्या कडून धवल गीतांचे बाळकडू घेतल्यानंतर यांनी खऱ्या अर्थाने खरंतर नवल गायनाला सर्वप्रथम आदेश आगास्कर यांच्या लग्न समारंभात पारंपरिक धवला गीत सादर करण्यात आला.विशेष म्हणजे, पारंपारिक पद्धतीने सर्वं रीत्यारिवाज ,प्रथा सांभाळून लग्न समारंभात यथा - योग्य पार पाड णाऱ्या करता नवी मुंबईतील कोपरखैरणे गाव व्यतिरिक्त घणसोली गाव ,बोनकोडे, कोपरी, सानपाडा असे विविध गावांमध्ये जाऊन लग्न समारंभात धवला गीत सादर करण्यात येत आहे.या धवल गीता मधुन आगरी कोळी समाजातील सांस्कृतिक परंपरेची राखणदार अशी ओळख नानूबाई दत्तु म्हात्रे यांनी निर्माण केली आहे.अशी माहिती येथील ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

आगरी कोळी समाजातील लग्नात ब्राह्मण म्हणून काम करणाऱ्या माणसाप्रमाणे धवलारीन सुद्धा लुप्त होत चाललेल्या आहेत .त्यातच आगरी कोळी हळदी - लग्नात जेव्हा धवला गीत सादर करण्यात येते तेव्हा वेगवेगळ्याच प्रकारचा काटा अंगावर उभा राहतो,यात विशेष काही तरी आहे म्हणून मी धवला गीत सादर करत सादर करत आहे.आगरी - कोळी लग्न समारंभात धवलारीनची पंरपरा वर्षानुवर्षे सुरू राहावी म्हणून धवलारीन ही आपल्या समाजाची शान आहे.- नानूबाई म्हात्रे,धवलारीन गायीका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |