ठाणे : ठाणे तालुक्यातील नारिवली गाव येथील रहिवाशी अनंता महादू भोईर यांचे शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 58 वर्षे होते.
शनिवारी नारिवली येथील समशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नारिवली ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
अनंता महादू भोईर यांच्या पश्चात पत्नी इंदिराबाई अनंत भोईर ३ मुले सागर, सुरज, सुधीर तसेच भाऊ राम महादू भोईर , लक्ष्मण महादू भोईर, भीम महादू भोईर बहीण व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा निधनाने भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा दशक्रिया विधी (दहावा ) शुक्रवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी गणेश घाट नारिवली येथे तर तेरावा विधी (उत्तरकार्य ) सोमवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी मु. नारिवली, तालुका / जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
