Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कोपर खैरणे येथे श्री राम जन्मोत्सव पालखी सोहळ्याचे आयोजन

 
नवी मुंबई: दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री राम जन्मोत्सव ( राम नवमी ) निमित्त कोपरखैरणे , सेक्टर -१९ ऐ येथील राजराजेश्वरी रणादेवी माता मंदिरात '"श्री रणादेवी माता मित्र मंडळाच्या वतीने येत्या २६ मार्च रोजी श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

 श्री राम जन्मोत्सव सोहळ्यात पहाटे ५ ते ७ श्री चा अभिषेक सकाळी ७.३० ते ८ महाआरती,सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती ( देवाची आळंदी ) रामायणाचार्य /भागवताचार्य यांचे श्री राम जन्मोत्सववाचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.त्याच बरोबर दुपारी १२ ते १ पाळणा व दर्शन, दुपारी १ ते ३ वेळत महाप्रसाद, संध्या.६.३० वाजता श्री ' ची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 " श्री रणादेवी माता मंडळा " चे मार्गदर्शक नवनिर्वाचित नगरसेवक श्री.शिवराम परशुराम पाटील आणी नवनिर्वाचित नगरसेविका सौ.अनिता शिवराम पाटील, मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प श्री.ज्ञानदेव परशुराम पाटील, तुळशीभाई मनानी, खजिनदार प्रवीण मनानी, कार्याध्यक्ष संदीप पाटील, अविन पाटील, ऋषिकेश पाटील, नंदकुमार पाटील, पंकज पाटील, मोरेश्वर आगास्कर, विकी पाटील, मनिष भगत यांच्यासह मंडळाचे सदस्य श्री राम जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.अशी माहिती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |