Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप.. मनसे नगरसेवकाने घेतला आक्षेप.. खासदारांना देणार माहिती

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडजवळील मोकळी जागा काही वर्षापूर्वी अत्यंत वाईट अवसस्थेत होती. दारुच्या पार्ट्या, घाण जागा अशी ही जागा असताना दानशूर व्यक्ती म्हणून ओळख असलेले मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वखर्चाने अतिशय सुदंर जागा बनविली. बसण्यास जागा, फिरण्यास व्यवस्थित जागा, पंथदिवे अशी छानशी जागा बनवली. पण रेल्वे प्रशासनाने सोमवार २० तारखेला सकाळी या ठीकणी अतिक्रमण झाल्याचे सांगत हतोडा मारला. यावेळी मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली कि नागरिकांसाठी ही सोय केली. असून रेल्वेच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करत नाही. त्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी परवानगी घ्यायला हवी होती असे सांगितले.

तसेच कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना याची माहिती देणार असल्याचेही मनसे नगरसेवक म्हात्रे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |