नवी मुंबई: कोपरखैरणे गावातील सेक्टर - १९ येथील पुरातन काळापासून असलेल्या श्री चेरेदेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही ५१ व्या वर्षी श्री चेरेदेव मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या माध्यमातून शनिवार दि.०२ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री चेरेदेव मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या माध्यमातून ही वर्षोनुवर्षे वर्षे जपली गेलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अशी माहिती ग्रामस्थ श्री.अविनाश भरत पाटील यांनी दिली.
कार्यक्रमा उत्सवानिमित्त सकाळी ९ वाजता गणेश पुजन व अभिषेक सोहळा, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन होणार असून दुपारी २ वाजे पासुन कोपरखैरणे गावातील महिला/ पुरुष मंडळ्यांचे भजन वेळेवर होणार असून सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
