Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

इंडिपेंडन्ट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे : इंडिपेंडन्ट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन, ठाणे यांच्या वतीने विविध प्रलंबित शैक्षणिक मागण्यांसाठी गुरुवारी 30 एप्रिल रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

संघटनेने आपल्या निवेदनात आरटीई शुल्क परतफेड, अनधिकृत शाळांवर कारवाई, शैक्षणिक संस्थांवरील वाढता प्रशासकीय हस्तक्षेप थांबवणे, तसेच शिक्षक व संस्थाचालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासह विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. साईनाथ म्हात्रे, उपाध्यक्ष स्वप्निल गायकर , सचिव गजानन पाटील महेंद्र पाटील सर यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संघटनेने प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |