Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिवसेना ( शिंदे गट ) - नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख पदी श्री. रमाकांत मढवी यांची नियुक्ती

ठाणे : शिवसेना (शिंदे गट) ने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी संपर्कप्रमुख पदी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे रमाकांत मढवी यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी राजकीय रणनीतीचा हा भाग आहे.

पक्षाने मढवी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

रमाकांत मढवी यांनी ठाणे महापालिकेत उपमहापौर पद भूषवले असून ते ठाणे महापालिकेत विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी संपर्कप्रमुख पदाची धुरा दिल्याने मढवी यांची जबाबदारी वाढलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |