नवी मुंबई: कोपरी गावातील येत्या ११ तारखेला श्री हनुमान मंदिरामध्ये सायंकाळी ४: वाजता श्री नर्मदा परिक्रमा करणारे ह.भ.प. श्री.विशाल जयंतीलाल पाटील महाराज यांच्या समवेत कोपरखैरणे येथील ह.भ.प. कृ.धनंजय रामेश्वर वेटा ( पखवाज वादक) यांचे १०८ दिवसभराची अतिशय कठीण व पायी चालत ही परिक्रमा करून त्यांनचे आगमन होणार असून त्या ठिकाणाहून विठ्ठल - रूक्मिणी सेवा वारकरी मंडळ ,कोपरी गाव ग्रामस्थ मंडळ यांच्या समवेत गावदेवी महिला मंडळ कोपरी व नवी मुंबईतील समस्त भाविक मंडळी यांच्या माध्यमातून टाळ मृदंगाच्या नाम घोषात दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात येणार असून सांय ५ वा.सांगता मी गावदेवी मंदिरांमध्ये ५.३० ते ७ वाजेपर्यंत श्री नर्मदा मय्याचे पुजन तसेच कन्या पुजन होणार असून नवी मुंबईतील पहिले श्री नर्मदा परिक्रमा करणारे किर्तनकार ह.भ.प.श्री.ज्ञानराज महाराज म्हात्रे कोपरखैरणे यांचे सुश्राव्य असे किर्तन होणार आहे.सांय ७ वा.आरती व महाप्रसाद भोजन महाप्रसादाचे आयोजन होईल व कार्यक्रमाची सांगता होईल.अशी माहिती कोपर खैरणेतील ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.
कोपरी गावा मध्ये होणार श्री नर्मदा परिक्रमावासी यांचे आगमन
एप्रिल ०७, २०२६
