नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर -१९ येथील श्री हनुमान मंदिरात पवित्र अश्या मानल्या जाणाऱ्या अधिक मास महिन्या निमित्त वै.ह.भ.प.रामचंद्र महाराज बोधे ( आळंदी ),वै.ह.भ.प.मारुती महाराज कुरेकर ( आळंदी ),वै.ह.भ.प आदितवार महाराज म्हात्रे ( कोपरखैरणे ),वै.ह.भ.प.रघुनाथ महाराज म्हात्रे (कोपरखैरणे ) यांच्या कृपा आशिर्वादाने श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळाच्या माध्यमातून येत्या ५ जुन ते १२ जुन या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने किर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम होणार आहे.दररोज पहाटे ५ ते ६ वा.काकड आरती, सकाळी ८ ते दुपारी १ वा.गाथा पारायण, संध्या.४.३० ते ५.३० वा.प्रवचन , संध्या.५.३० ते ६.३० वा. सुश्राव्य असे हरिपाठ होणार आहे.रात्री ८ ते १० या वेळेत श्री कथेवर आधारित किर्तन होणार आहे.
ह.भ.प.दिनानाथ महाराज भोईर यांचे ५ जुन या सप्ताहाच्या प्रथम दिवसी किर्तन होणार आहे.अन्य दिवशी किर्तनकार - ह.भ.प.बबन महाराज नाईक ( बोनकोडे ),ह.भ.प.सनकादीक महाराज म्हात्रे ( बोनकोडे ),ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे ( कोपरखैरणे ), श्री नर्मदा परिक्रमा वासी ह.भ.प. विशाल महाराज पाटील ( कोपरी ),ह.भ.प.नकुल महाराज भोईर ( कोपरी ), ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सोपान महाराज म्हात्रे (कोपरखैरणे ) यांचे किर्तन होणार असून काल्याचे किर्तन ह.भ.प ज्ञानराज महाराज म्हात्रे (कोपरखैरणे ) हे सादर करणार आहेत.
या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सोपान महाराज म्हात्रे, खजिनदार - नकुल शिवराम भोईर तसेच चिटणीस - ह.भ.प.नामदेव जगन्नाथ ठाकुर यांच्या समवेत ह.भ.प. ज्ञानराज महाराज म्हात्रे,ह.भ.प.शुभम महाराज पाटील तसेच श्री.रामेश्वर पांडुरंग वेटा यांच्या समवेत कोपरखैरणे ग्राम विकास मंडळ कोपरखैरणे गांव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.अशी माहिती ग्रामस्थ श्री.अविनाश भरत पाटील यांनी दिली.

