Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

क्रिकेटच्या मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी.. `ठाणे प्रिमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे - राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचे मन जिंकले. निमित्त होते नगरसेवक विकास रेपाळे यांच्या महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लिग `उमुख्यमंत्री चषका'चे उद्घाटन.

महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२६ चे आयोजन दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उत्कृष्ठ फलंदाजी करत चौकार आणि षटकार ठोकले.

उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेश खानविलकर, कार्यकारी सेक्रेटरी सी.एस. नाईक, युनियन क्लबचे तुषार समाणी, रॉयल क्लबचे सुनील करंदीकर, व्होल्टासचे अदिर काजारी, ठाण्याचे माजी महापौर रमेश वैती, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे आयोजक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिल मेंबर विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले-जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ठाण्यातील रणजी खेळाडू चिन्मय सुतार, साईराज पाटील आणि अखिल हेरवाडकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लेदर क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी टीपीएल नावाने प्रसिद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली १४ वर्ष ठाण्यात रंगत आहे. आयपीएल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळतांना ठाणेकरांना पाहता येणार आहे. तसेच स्पर्धे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |