Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिव्याला एक आता नवी स्वतंत्र ओळख...दिव्यासाठी स्वतंत्र ४००६११ हा पिनकोड जाहीर...


"जागा हो दिवेकर" च्या माध्यमातून श्री. विजय अनंत भोईर यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला अखेर यश

दिवा  - "जागा हो दिवेकर" च्या माध्यमातून श्री. विजय अनंत भोईर गेले कित्येक वर्षे सतत दिव्याला एक स्वतंत्र पिनकोड मिळावा यासाठी सतत पत्रव्यवहार, केंद्रात निवेदने देत होते. आणि त्याची दखल केंद्रातून घेतली गेली आहे आणि दिव्याला आता स्वतंत्र पिनकोड मिळाला आहे. 

यासाठी सतत श्री .विजय भोईर आता तरी जागा हो दिवेकर या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या मार्फत स्वतः ते आणि त्यांचे सहकारी GPO , मुंबई हेड ऑफिस पण त्यासाठी भेटले होते. तद्नंतर जेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तेव्हा आणखी ताकदीने या कामासाठी त्यांना बळ मिळाले. दिव्याला मुंब्र्यासोबत पिनकोड असल्याने भरपूर अडचणी येत होत्या ज्या त्यांनी वेळोवेळी ठाण्याचे आदरणीय आमदार संजय केळकर साहेब, निरंजन डावखरे साहेब यांच्यामार्फत त्यांनी पक्षाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच यासाठी भोईर यांनी  स्वतःही दिल्ली पर्यंत पत्रव्यवहार केले होते.

 खासदार श्री. विनयजी सहस्त्रबुद्धे यांनाही दिल्लीला जाताना स्वतः भेटून पत्र दिले होते. आणि पिनकोड बदलणे खूप गरजेचे आहे हे पटवून दिले होते. शिवाय ठाणे पोस्टात तर कित्येक फेऱ्या मारल्या होत्या.

आणि त्याचे फळ म्हणजे आज दिव्यासाठी स्वतंत्र ४००६११ हा पिनकोड जाहीर होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे.

अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल सर्व नागरिकांकडून तसेच सर्व पक्षीय दिव्यातील लोकप्रतिनिधींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |