दिवा : आगरी युवक संघटनेचे (आयुस) संस्थापक आणि प्रमुख ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील रहिवाशी गोविंद भगत यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आगरी समाजातील एक बुलंद आवाज आणि धडाडीचे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गोविंद भगत यांनी आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून आगरी-कोळी आणि भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. सिडको आणि नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या हक्क, torrent power विरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली होती.
ठाणे ,नवी मुंबई आणि रायगड परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. 'आयुस' संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना एकत्र करून समाजकार्याची नवी दिशा दिली होती.
समाजातील अन्यायाविरुद्ध लढणे, तरुणांना रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणेयासाठी ते नेहमी अग्रभागी असत.आगासन येथिल रेल्वे स्थानकाबाबत आंदोलनात त्यांची मोलाची भूमिका राहिली . स्व. दिबा पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते नेहमीच समाजकार्यात सहभागी असत.
त्यांच्या निधनानंतर सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीगाठीतून अनेक राजकीय व सामाजिक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपला शहरनामा व आपले शहर वृत्त समूहाकडून गोविंद भगत यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

.png)