मुंबई : शिवसेनेतर्फे सौ. शायना एन. सी. यांची पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असून, 1 मे 2026 पासून एका वर्षासाठी लागू राहील.
बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.
