Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नगरसेवक शिरिष पाटील यांच्या तर्फे श्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !

नवी मुंबई: नवनिर्वाचित नगरसेवक श्री.शिरिष प्रभाकर पाटील, समाजसेवीका सौ.निषा शिरिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कोपरखैरणे आणी श्री प्रतिष्ठान कोपरखैरणे यांच्या मार्फत कोपरखैरणे सेक्टर १९-२० मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ होळी मैदान , सेक्टर - १९/ ए या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.कोपरखैरणे प्रभाग -११ मधील इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या तसेच विशेष नैपुण्य प्राप्त व्यक्ती , बॅन्ड पथकं, अखंड हरिनाम सप्ताहास सेवा करणारे वारकरी संप्रदाय व सेवापृत्ती सत्कारार्थी चा " गुणगौरव सोहळा - २०२६ अतिशय उत्साहात संपन्न झाला. 

नगरसेवक श्री.शिरिष प्रभाकर पाटील यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कोपरखैरणे प्रभाग क्रमांक -११ मधील गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे नगरसेवक श्री.शिरिष प्रभाकर पाटील यांनी विद्यार्थी - विद्यार्थ्यांनीच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचे यंदा १९ सावे वर्ष आहे.

या गुणगौरव सोहळ्याचे औचित्य साधून उज्ज्वल झालेल्या विद्यार्थ्यांन साठी सन्मान चिन्ह ,सुटकेस,संगणक बॅग तसेच कागदपत्रांसाठी दर्जेदार बॅग, घड्याळ,फुल गुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पाणीपुरवठा सभापती रविकांत पाटील, नगरसेविका मीनाक्षी किशोर पाटील आणि डी.आर पाटील,इ प्रभाग समिती अध्यक्ष मोरे मॅडम, परिवहन विभाग सदस्य श्रेया सकपाळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणी पालकांचा अभिमान या सोहळ्याची खरी पावती ठरली.

या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे महिला - पुरुष पदाधिकारी, कार्यकते ,पालक आणी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. गेल्या १९ साव्या वर्षांपासून श्री प्रतिष्ठान तसेच नगरसेवक श्री.शिरिष प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थ्यांनीचा सन्मान करत आहे.तरूण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

गुणगौरव कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशाचा सन्मान करण्याची संधी मिळते,असे मनोगत यावेळी नगरसेवक श्री.शिरिष प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केले.

ह्या कार्यक्रम साठी प्रशांत दळवी, विकास म्हात्रे,मनीष तांबेवाय, उत्कर्षा सावंत, ओमकार दाभाडे, निकिता धुमाळ, किशोर देशमुख, श्वेता अरागडे, संजय म्हात्रे,उमेश पाटील, अक्षय देशमाने, कल्पेश शांताराम पाटील, संदीप प्रभाकर पाटील, श्रीराज शिरिष पाटील आणि सोहम संदीप पाटील यांनी ह्या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |