Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आषाढी एकादशी निमित्त ८०० किलोमीटरचा ४५ दिवसांचा पायी प्रवास करणारे विणेकरी ह.भ.प धर्मेश शिवराम पाटील ( बोनकोडे ) यांचे कोपरखैरण्यात झाले जल्लोषात स्वागत !

 नवी मुंबई: आषाढी एकादशी निमित्त कोपरखैरणे ते श्री क्षेत्र आळंदी, आळंदी ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते कोपरखैरणे असा तब्बल ८०० किलोमीटरचा ४५ दिवसांचा पायी प्रवास करणारे विणेकरी ह.भ.प धर्मेश शिवराम पाटील ( बोनकोडे ) यांच्या समवेत श्री नर्मदा परिक्रमा करणारे किर्तनकार ह.भ.प श्री.विशाल महाराज पाटील (कोपरी ),ह.भ.प श्री.दिपक महाराज म्हात्रे ( बोनकोडे ),ह.भ.प. कु.माऊली नामदेव ठाकुर,ह.भ.प पांडुरंग नारायण पाटील ( पहारे - भिवंडी ),ह.भ.प. श्री.श्रीकांत मनोहर मढवी ( बोनकोडे) यांचे शुक्रवारी १४ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास कोपरखैरणे गावातील श्री हनुमान मंदिरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.वयाच्या २१ वर्षे असलेल्या ह.भ.प पांडुरंग नारायण पाटील पहारे हे वयाच्या गेल्या ५ व्या वर्षांपासून,तर ह.भ.प.धर्मेश नारायण पाटील गेल्या वर्षांपासून हाती वीणा घेत ही पायी वारी करीत आहेत.

कोपरखैरणेतील श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळाच्या वतीने श्री हनुमान मंदिरात प्रवेश होताच वारकऱ्यांनी टाळ- मृदुंगाच्या गजरात आणी विठ्ठल नामाच्या जयघोषात गावातुन मिरवणूक काढण्यात आली. " गुरुवर्य अदितवार महाराज म्हात्रे यांच्या प्रेरणेने श्री विठ्ठल - रखुमाई सेवा वारकरी मंडळाच्या वतीने कोपरखैरणेतुन गेल्या २८ वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त कोपरखैरणे ते आळंदी - पंढरपूर अशी पायी दिंडी काढली जाते. " ह.भ.प.सोपान महाराज म्हात्रे,( किर्तन कार ) दिंडी क्रमांक १८८ चे चालक. जल्लोषात स्वागत! श्री हनुमान मंदिरात ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले.या वेळी हरिदास वेटा , दिनेश म्हात्रे यांच्या समवेत किर्तनकार ह.भ.प. ज्ञानराज महाराज म्हात्रे,पंखवाज वादक - ह.भ.प. कु.धनंजय रामेश्वर वेटा,ह.भ.प श्री.ऋषिकेश ठाकूर (कोपरी ), श्री.रामेश्वर वेटा यांच्या सह इतर वारकरी संप्रदाय उपस्थित होता.पायी परतीचा प्रवास करून येणाऱ्या वारकऱ्यांनी कोपरखैरणे गावातील दिव्यांग - अविनाश भरत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |