झिम्मा, फुगडी, गोफसह पारंपरिक खेळांची रंगत; विजेत्यांना रोख बक्षिसे, ५ महिलांना लकी ड्रॉमधून पैठणी
ठाणे ( विनोद वास्कर ) : श्रावण म्हटला की मंगळागौरीचा उत्सव आणि महिलांचा उत्साह हे समीकरण ठरलेलेच. दैनंदिन संसाराच्या धावपळीतून काही क्षण मोकळा श्वास घेत महिलांना मनसोक्त आनंद लुटता यावा, तसेच पारंपरिक संस्कृती आणि खेळांची परंपरा पुढे जावी, या उद्देशाने नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांच्या पुढाकाराने ‘वेदिका ताईंच्या मंगळागौरीचा साज–२०२६’ या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तळेपाडा, देसाई येथील मातोश्री मंगल कार्यालयात रंगणार आहे.
या सोहळ्यात झिम्मा, फुगडी, गोफ यांसह विविध पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर केले जाणार आहेत. महिलांना एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, माहेरपणाची आठवण जागवणाऱ्या या पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी उत्सवाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
रोख बक्षिसांची आकर्षक मेजवानी
उत्सवातील स्पर्धेसाठी एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त १० महिलांना सहभागी होता येणार असून प्रत्येक ग्रुपला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. सहभागी महिलांसाठी मराठी पारंपरिक वेशभूषा अनिवार्य असून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
🥇 प्रथम पारितोषिक – ₹११,१११
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹७,७७७
🥉 तृतीय पारितोषिक – ₹३,३३३
याशिवाय ५ भाग्यवान महिलांची लकी ड्रॉद्वारे पैठणी साडीसाठी निवड करण्यात येणार आहे.
महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
‘आपली संस्कृती जपूया, परंपरा पुढे नेऊया आणि मंगळागौरीचा आनंद एकत्र साजरा करूया,’ या संकल्पनेतून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजिका नगरसेविका सौ. वेदिका साहिल पाटील (ठाणे महानगरपालिका) आणि श्री. साहिल बाळाराम पाटील (जिल्हाध्यक्ष, भाजपा अभियंता प्रकोष्ठ, ठाणे) यांनी केले आहे.
सहभागासाठी नोंदणी सुरू असून इच्छुक महिलांनी आपल्या ग्रुपची लवकरात लवकर नोंदणी करावी.
📞 नोंदणी संपर्क : ९२२४४१८०८१


