Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिळफाटा परिसरातील शिबली नगरमध्ये नळाला निळे पाणी आल्याने नागरिक संभ्रमात; पाण्याचे नमुने तपासणीला पाठवणार

शिळफाटा / ठाणे ( विनोद वास्कर ) : शिळफाटा परिसरातील शिबली नगर येथे नागरिकांच्या घरातील नळांना निळ्या रंगाचे पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. पिण्याच्या पाण्यात रसायन मिसळल्याची भीती व्यक्त होत असून परिसरात चर्चा सुरू आहे.

गोडाऊनमधील रसायन गळतीचा संशय

स्थानिक नागरिकांच्या मते, शिळफाटा परिसरात असलेल्या एखाद्या कंपनीच्या गोडाऊनमधून मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. त्या गोडाऊनमधील निळ्या रंगाचे केमिकल पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळत असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नळाला येणारे पाणी पूर्णपणे निळ्या शाईसारखे आहे. हे पाणी केमिकलयुक्त असू शकते. आम्ही तातडीने याची माहिती नगरसेवकांना दिली आहे, असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते ॲड. जाफर सय्यद यांनी शिळ पोलीस ग्रुप मित्र या व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती देताना सांगितले.

प्रशासनाकडून तातडीने शोध मोहीम सुरू

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका वेदिका पाटील यांनी तात्काळ दिवा प्रभाग समितीच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला.

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी साळुंखे, वाघिरे आणि गोसावी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पथकासह घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे. लवकरच गळतीचे नेमके ठिकाण शोधून दुरुस्ती करण्यात येईल आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिले आहे.

दरम्यान, जोपर्यंत पाण्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी नळाचे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |