Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या उपाध्यक्षपदी ठाण्याचे कान, नाक, घसा तज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी

मुंबई : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या उपाध्यक्षपदी ठाणेचे प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांची मंगळवारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई येथील परिषदेच्या कार्यालयातील सभागृहात झाली. या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेत एकूण १८ सदस्य असून, त्यापैकी ९ सदस्यांची शासनामार्फत नियुक्ती केली जाते, तर ९ सदस्यांची प्रत्यक्ष निवडणुकीतून निवड होते. मंगळवारी झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान १८ पैकी १७ सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते, तर एका सदस्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार प्रत्यक्ष उपस्थित १७ सदस्यांनी एकमताने डॉ. संजय कदम यांची अध्यक्षपदी आणि डॉ. राहुल कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.

डॉ. राहुल कुलकर्णी हे ठाणे येथे २० वर्षापासुन कान नाक घसा तज्ञ म्हणुन प्रॅक्टिस करतात .त्यांचे मिनाताई ठाकरे चौकामध्ये कान नाक घसा हॅास्पिटल आहे वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव तसेच डॉक्टरांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा विचार करून त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या ऊपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच उपसचिव श्री. संदीप ढाकणे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पडली.

यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षांसोबतच कार्यकारी समितीचीही निवड करण्यात आली. कार्यकारी समितीमध्ये डॉ. अनिल पाटील (जळगाव), डॉ. सुनील इंगळे (पुणे), डॉ. संजय देशपांडे (नागपूर), डॉ. प्रशांत चौधरी (पुणे), डॉ. उज्वला दहिफळे (छत्रपती संभाजीनगर) आणि डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर (नागपूर) यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारी समितीच्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर आणि रुग्णांच्या हिताला प्राधान्य
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर तसेच निवासी डॉक्टरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कार्यरत राहील. परिषदेचे कामकाज अधिक पारदर्शक पद्धतीने राबवून सर्वसामान्य रुग्ण तसेच डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा आशावाद नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय कदम आणि उपाध्यक्ष डॉ. राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |