Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

बलात्कारांना कठोर फाशीची शिक्षा करा; अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

स्वामीनगर महिला मंडळाच्या वतीने अंबरनाथच्या तहसीलदारांना निवेदन

अंबरनाथ दि. १५ (नवाज वणू) : देशाच्या विविध भागांत महिलांवर आणि लहान मुलींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर कायदे करावेत, तसेच पीडितांना जलद न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र जलदगती न्यायालये स्थापन करावीत, अशी मागणी स्वामीनगर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयावर शांततेत मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

महिलांवरील हिंसाचार व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी कायदे करावेत. तसेच सध्याच्या कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करून अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा व्हावा, यासाठी स्वतंत्र जलदगती न्यायालये स्थापन करावीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला पोलीस कक्षांची नियुक्ती करावी, तसेच महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या मागण्या केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती मंडळाने तहसीलदारांकडे केली आहे.
याप्रसंगी राजकुमारी कोंडर, सुलताना सय्यद, महालक्ष्मी चिनाटू, लक्ष्मी कन्नन, मुमताज शेख, तब्बसुम शेख, सुनंदा नायर यांच्यासह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |