Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

'जल्लोष लोककलेचा’ राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत प्रथमेश दोडेकर प्रथम

ठाणे, दि. ५ : बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या उपक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत कु. प्रथमेश संदीप दोडेकर याने आपल्या दमदार आणि सुमधुर गायनाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

प्रथमेशने आपल्या प्रभावी आणि सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत अव्वल स्थान मिळविले.
प्रथमेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रसिद्ध मराठी चित्रपट, मालिका व नाट्य अभिनेत्री सौ. नीलम शिर्के-सामंत, ‘सा रे ग म प’च्या पहिल्या पर्वाचे विजेते श्री. मंगेश बोरगावकर तसेच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते त्याला पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

प्रथमेश दोडेकर याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |