Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ रवाना ; कल्याण डोंबिवली मधील 9 खेळाडूचा समावेश

कल्याण : कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या वतीने महाराष्ट्राचा १६ खेळाडूंचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा व उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे रवाना झाला आहे. अकॅडमीचा हा सलग १८ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा असून २५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हा दौरा पार पडणार आहे

या दौऱ्यामध्ये संघ दोन डे-नाईट सामने आणि आठ टी-२० डे सामने खेळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॉर्केल बंधू आणि लायन्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक घर्नेत क्रुगर व कर्ट हुमन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि व्यावसायिक क्रिकेटमधील बारकावे शिकण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे.

या दौऱ्याचे प्रमुख म्हणून संतोष पाठक काम पाहणार असून, प्रशिक्षक म्हणून परेश दिलीप हिंदुराव आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अश्विनी योगेश चौधरी जबाबदारी सांभाळणार आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी, आमदार संजय दत्त, बृजकिशोर दत्त आणि राज्य क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

निवड झालेले खेळाडू 

सात्विक चेतन कारेकर, यश विठ्ठल भुरबुडा, मितांश अश्विन लोणे, कृष्णा धामी, किमया संदेश कदम, संचित संदीप गोरे, शौर्य सचिन शिर्के, राजवीर विलास कुटे, कविश योगेश चौधरी, रुद्र शैलेंद्र मेढी, सलिल संतोष साटम, कार्तिक अरुण लोखंडे, सार्विल तुषार दिवाटे, जयकृष्ण अशोक भोये, रुद्र प्रथमेश दाहोत्रे, आरव स्वप्निल कांबळे

दौऱ्याचे प्रमुख संतोष पाठक यांनी सांगितले की, “संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून गेली १८ वर्षे युवा क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची आणि दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दौऱ्यामुळे खेळाडूंना केवळ क्रिकेटचे तांत्रिक ज्ञान मिळणार नाही, तर शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचा अनुभवही मिळेल. भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी सक्षम खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |