आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे नगरसेविका माधुरीताई मेटांगे यांची उपस्थिती
ठाणे : दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय, खोपट येथे आमदार चषक कबड्डी परिवार आणि सुधागड तालुका रहिवासी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहमेळाव्याला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर आणि विधान परिषदेतील कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे, नगरसेविका माधुरीताई मेटांगे, भाजपा सरचिटणीस विक्रम भोईर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमधील स्नेहभाव आणि आपुलकीची नाती अधिक दृढ व्हावीत, या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाचे क्षण साजरे केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यामुळे सामाजिक एकोपा आणि परस्परांतील जिव्हाळ्याला अधिक बळ मिळाले.
भाजपचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश सागळे आणि त्यांच्या सहकार्यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्नेहमेळावा आनंददायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी सुधागड तालुका ज्येष्ठ सल्लागार शिवाजी दळवी, सुधीर मांढरे, सल्लागार सुरेश शिंदे, कार्याध्यक्ष प्रकाश शिळकर, चिटणीस अविकांत साळुंखे, क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे, क्रिडा समिती उपप्रमुख जयगणेश दळवी, शिक्षण समिती उपप्रमुख श्याम बगडे, प्रवीण बामणे, विजय जाधव, धनंजय खाडे, रवींद्र सागळे, काशिनाथ सागळे, महेश मांढरे यांच्यासह सुधागड रहिवासी व आमदार चषक कबड्डी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
