Type Here to Get Search Results !

कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

                            

20,18,958 मतदार असून यात  तृतीयपंथी 738, दीव्यांग 10,802, नवमतदार 22,179 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या असुन 18 व्या लोकसभेसाठी 18 एप्रिल ते 1जूनपर्यंत निवडणुका होणार आहेत.‌ कल्याण लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी निवडणुका होणार आहे अशी माहिती कल्याण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय कार्यकारी अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवलीत दिली. कल्याण लोकसभा मतदार संघ मिळून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व - पश्चिम, डोंबिवली ,कळवा, मुंब्रा असे सहा मतदार संघ  आहेत. यामध्ये 20,18,958 मतदार असून यामध्ये तृतीयपंथी 738, दीव्यांग 10,802, नवमतदार 22,179 आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रात 1955 मतदान केंद्र आहेत.

        निवडणूक शांततेत पार पाडण्या बरोबरच मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांनी मतदानासाठी यावे असे आवाहन सातपुते यांनी केले. मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात 45 टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यामुळे 75 टक्के मतदान होणे आयोगाला अपेक्षित आहे. टक्केवारी वाढावी यासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.


निवडणूक कार्यक्रम :

निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक-२६ एप्रिल, २०२४ (शुक्रवार)

नाम निर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक-०३ मे, २०२४ (शुक्रवार)

नाम निर्देशन पत्रांची छाननी-०४ मे, २०२४ (शनिवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक-०६ मे, २०२४ (सोमवार)

मतदानाचा दिनांक-२० मे, २०२४ (सोमवार)

मतमोजणीचा दिनांक-०४ जून, २०२४ (मंगळवार)


85 वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .सिविजील ॲप द्वारे  निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता आढळल्यास या ॲपद्वारे संदेश शेअर करू शकतात.

नामनिर्देशित पत्र दाखल करणे, पत्रछाननी ,नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्हवाटप इ बाबतची कार्यवाही सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 4 जुन रोजी मतमोजणी होणार 

मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला 75 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आले आहे. 60 भरारी पथक, निवडूक पथक नेमण्यात आले आहेत. 23 एप्रिल पर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदान यादीत नाव नोंदणी करता येणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies