नालासोपारा : नालासोपारा येथे एका बोगस डॉक्टरने २२ वर्षीय तरुणीवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. बाबासाहेब पाटील असं या डॉक्टरचे नाव आहे. नालासोपारा पश्चिमेच्या छेडानगर मधील गौरव गॅलक्सी इमारतीत त्याचा दवाखाना आहे. सोमवारी २२ वर्षीय तरुणी उपचारासाठी आली होती. त्यावेळी पाटील याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून बलात्कार केला. बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६) आणि विनयभंगाचा (कलम ३५४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
बाबासाहेब पाटील नाशिकचा असून दर आठवड्याला नालासोपाऱ्यात उपचारासाठी येत असल्याचं इमारतीतील रहिवाशांनी सांगितलं. पाटील हा डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र तो वैद्य असल्याचा दावा करून मागील ३० वर्षांपासून मुळव्याधीवर उपचार करत असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक प्रमोद कदम यांनी दिली.