उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये अमली पदार्थांप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे स्टेशनजवळ गुलजार टॉवर परिसरातून सहा किलो गांजा आणि 10 ग्राम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलंय.
उल्हासगनमध्ये अनेक तरुण अमली पदार्थ्यांच्या विळख्यात सापडल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणावरून काही दिवसांपूर्वी 30 ते 40 अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली.
वरिष्ठांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. मध्यवर्ती पोलिसांच्या गुन्हे शाखेने हद्दीतील अमली पदार्थ विक्रेते शोधण्यास सुरूवात केली आहे.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आकाश पंजवानी, रोहित गुप्ता, समीर खत्री आणि सोमनाथ सोनावणे यांना अटक केलीये. तेसच त्यांच्याकडून तीन लाख 90 हजार रुपयांचा सहा किलोचा गांजा आणि 10 ग्राम एमडीड्रग्स जप्त केला आहे.