Type Here to Get Search Results !

भूमिपुत्र संघटना लढवणार कल्याण लोकसभा निवडणूक

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी स्थानिक भूमिपुत्र उमेदवार असावा अशी येथील भूमीपुत्रांची अपेक्षा होती. परंतु कोणत्याही पक्षाने याकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच ठाणे पंचक्रोशीतील भूमिपुत्र संघटना एकत्र येऊन भूमीपुत्रांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोंधळी यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरावा असे निश्चित आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.


मंगळवारी १६ मार्च रोजी  सायंकाळी श्री कालिका माता मंदिर निळजेगाव येथे  पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी  मोतीराम दादा गोंधळी,भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे अधक्ष महेंद्र सर पाटील, भालचंद्र पाटील, मंगेश भोईर,श्री मलंग मुक्ती  आंदोलनाचे राजेश गायकर, ओमकार पावशे, रोशन भोईर,  रविंद्र पाटील, कल्पेश पाटील, गोरखनाथ पाटील हे उपस्थित  होते.

   डोंबिवली येथे भूमिपुत्र समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये भूमिपुत्र संघटनांच्या वतीने मोतीराम गोंधळी हॆ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अनेक सामाजिक संघटना व लढ्यांमध्ये मोतीराम गोंधळी हॆ सक्रिय सहभागी असून टोरंटो विरोधात 20 दिवसांचे उपोषणही केलेले आहे. गोवंश वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. गोंधळी यांना अनेकदा खोट्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्नही झालेला आहे. तरीही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरु ठेवलेले आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.अशा या गोरगरिबांसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या व देव देश धर्मासाठी कार्य करणाऱ्या भूमिपुत्रालाच निवडून देण्यासाठी समाजातील अनेक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक वसंत पाटील यांच्या वयोमानाच्या मर्यादेमुळे उमेदवारीची मागणी मागे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आगरी रेल सहकार (कल्याण), रेल्वे भूमिपुत्र संघटना (कल्याण), शेतकरी भूमिपुत्र संघटना (ठाणे), भूमिकन्या संघटना (ठाणे), भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना (भारत देश) अशा अनेक संघटनांचा दुजोरा मिळाला आहे. भूमिपुत्र आपला उमेदवार निवडणूक रिंगणात आणण्याचे ठरवण्यात आलेले असून तीन अपक्ष उमेदवार इच्छुक असून नाव फायनल झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, मात्र भूमिपुत्र संघटना अपक्ष उमेदवारी घेऊन लढणार हे निश्चित आहे. कल्याण मतदार संघातून मोतीराम गोंधळी आणखी इच्छुक दोघेजण यातून एकास निश्चित कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवार म्हणून उभा करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies