Type Here to Get Search Results !

ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

 


ठाणे, दि. 24 -  १४६ ओवळा माजिवडाविधानसभा क्षेत्रातील विविध भागात मतदान नोंदणी अधिकारी आशिषकुमार बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकारी वर्षा दिक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत स्वीप (Sveep) मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमातंर्गत शिवाई नगर मध्ये देवदया नगर रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा चालक यांना मतदान करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले. तसेच सेंट मेरी हायस्कूलवसंत विहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हरिकिसन स्कूल पोखरण रोड येथे देखील जनजागृती करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून वसंतविहार येथील श्री. बंशिधरजी हनुमान ट्रस्ट येथे आलेल्या भाविकांमध्ये देखील मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.


146 ओवळा-माजिवडा प्रभाग अंतर्गत भाईंदर पूर्व नवघर रोड येथील भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान येथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांमध्ये तसेच Max Moxa Gym येथे सरावासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये  मतदान जनजागृती करण्यात आली व जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मिरा भाईंदर महानगरपालिका, कार्यक्षेत्र अंतर्गत महिला बचत गटाच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. लोढा पेरेडाईज व लोढा क्लब माजिवडा ठाणे येथे नोडल अधिकारी  सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्वीप पथकाचे श्री.कैलास शेवंते, श्री.अशोक भोये व सर्व स्वीप कर्मचारी यांनी  मतदारांमध्ये जनजागृती करण्या बाबत सर्व महिला व नागरिकांना 100% मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies